दररोज कोविड -19च्या केसेसमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आज देशात 2,483 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कालच महाराष्ट्रात CM बोलले की, मास्क सक्ती नाही, पण मास्क मुक्त अजून झालो नाही. तर देशातील इतर राज्यात कोविडच्या वाढत्या केसेसमुळे कर्नाटक आणि छत्तीसगडने सोमवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य केले आहे. (COVID-19 Latest Updates)
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यांनी होम क्वारंटाईन आणि सामाजिक अंतराचे (Social Distancing) नियमही रद्द केले आहेत.
यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महसूल मंत्री आर अशोक, आरोग्य मंत्री के सुधाकर, आरोग्य आयुक्त डी रणदीप आणि तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांसह संभाव्य चौथ्या कोविड लाटेच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री म्हणाले की, मास्क सक्तीचे असले तरी नियमाचे उल्लंघन केल्यास दंड होणार नाही. तसेच ते म्हणाले, “27 एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. त्यानंतर आमची आणखी एक बैठक होईल आणि पुढील कोविड नियमावली संदर्भात उपाययोजना केल्या जातील.”
हे देखील पाहा-
दरम्यान, सोमवारी एका व्हिडीओ बैठकीत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि लसीकरण वाढवण्यात यावे याची खात्री करण्यास सांगितले आहे.
तर, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, काळजी करण्याची गरज नाही“…परंतु इतर राज्यांच्या केसेसच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आम्हीही यासाठी सतर्क राहू. तसेच आम्ही सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.