जिच्यावर बलात्कार, अश्लिल फोटो व्हायरल केले; तिच्याशीच करावं लागणार लग्न, कोर्टाचा निर्णय काय? Google
देश विदेश

Uttar Pradesh Crime: जिच्यावर बलात्कार, अश्लिल फोटो व्हायरल केले; तिच्याशीच करावं लागणार लग्न, कोर्टाचा निर्णय काय?

Uttar Pradesh : उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका तरुणाला सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना असे स्पष्ट केले आहे की, आरोपीने तुरुंगातून सुटल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पीडित मुलीसोबत विवाह करावा. या प्रकरणात आरोपीवर यूपी पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचे खोटे आश्वासन देऊन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आग्रा येथील खंडौली परिसरात पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आलेल्या एका तरुणीवर बलात्कार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पीडितेच्या तक्रारीवरून खंडौली पोलिस ठाण्यात बलात्कार, आयटी कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर, आरोपीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे.

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील जाजोद पोलीस स्टेशन परिसरातील खतुंड्रा गावातील रहिवासी नरेश मीना उर्फ नरसा राम मीना यांना उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर तीन महिन्यांच्या आत आरोपीने पीडितेसोबत विवाह करावा, अशी अट घालण्यात आली आहे.

पीडितेने खंडौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती एका खाजगी कोचिंग संस्थेमध्ये पोलिस भरती परीक्षेची तयारी करत होती. आरोपी देखील त्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. दोघांमध्ये ओळख झाली आणि संवाद सुरू झाला.

तक्रारीनुसार, आरोपी नरेशने पोलिस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीकडून ९ लाख रुपये मागितले. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी तो तिला पोलिस भरती परीक्षेसाठी आग्रा येथे घेऊन गेला. मात्र, वैद्यकीय उपचाराचे कारण देत त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याने तरुणीच्या शरीरावर काही पावडर लावली, ज्यामुळे तिचे शरीर सुन्न झाले. या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर त्याने या फोटो व व्हिडिओच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करून वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आणि संबंधित आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT