Kabaddi match betting SAAM TV
देश विदेश

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Kabaddi match betting: कर्नाटकात ५०० रुपयांच्या पैजेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बंगळूरू कोर्टाने गृहमंत्री आणि उपायुक्तांविरोधात FIR नोंदवण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कर्नाटकातील एका छोट्याशा घटनेवरून मोठा कायदेशीर वाद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ५०० रूपयांची पैज लावल्याने कोर्टाने थेट गृहमंत्र्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी बंगळूरूच्या सत्र न्यायालयाने हे आदेश दिल्याची माहिती आहे.

मंगळवारी बंगळूरूच्या सत्र न्यायालयाने कोडिगेहल्ली पोलीस ठाण्याला कर्नाटकाचे गृहमंत्री जी परमेश्वर आणि कुमकूरूच्या उपायुक्त शुभा कल्याण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्यावर्षी तुमकूरूमध्ये झालेल्या कबड्डीच्या स्पर्धेदरम्यान लावलेल्या पैजेवरून हा प्रकार घडला आहे.

बार अँड बेंचच्या अहवालानुसार, 42वे अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी के.एन. शिवकुमार यांनी काही वृत्तपत्रांमधील बातम्यांचा आधार घेतला आणि त्यानंतर हा गुन्हा बनत असल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांनी यापूर्वी पुरावे नसल्याचं सांगत यासंदर्भातील तक्रारी फेटाळून लावल्या होत्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

तुमकुरूमध्ये विद्यार्थ्यांसाठी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान गृहमंत्री परमेश्वर यांनी विजयपुरा टीमच्या समर्थनार्थ उपायुक्त शुभा कल्याण यांच्यासोबत ५०० रूपयांची पैज लावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, यावेळी फायनल सामन्यात दक्षिण कन्नड टीमने 36-26 अशा फरकाने विजय मिळवला.

तक्रारीमध्ये काय म्हटलंय?

तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, ज्यावेळी बक्षीसांचं वाटप केलं जात होतं, त्यावेळी गृहमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या पैज हरल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीररित्या चौकशी सुरू करण्यात आली होती. जरी रक्कम लहान असली आणि पैज गमतीने लावली असेल, तरी तक्रारदाराने सट्टेबाजी हा कायदेशीर गुन्हा असल्याचा मुद्दा मांडला होता.

गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींनी सट्टेबाजीसारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेणं किंवा त्या गोष्टींना प्रोत्साहन देणं टाळलं पाहिजे. अशा गोष्टींमुळे गैरकृत्यांना खतपाणी मिळू शकतं, असा युक्तीवाद करण्यात आला.

विरोधी पक्षानेही केली टीका

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षानेही यावर टीका करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत FDA आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Wednesday Horoscope: 7 राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

Sleeping Without Underwear: रात्रीच्या वेळेस अंतर्वस्त्र घालून झोपणं योग्य की अयोग्य?

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT