नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेपासून संपूर्ण युरोपमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) आता भारत-चीन आणि पाकिस्तानसह अनेक आशियाई देशांमध्येही वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत 8 पेक्षा जास्त राज्यांमध्ये 45 रुग्ण आढळले आहेत. परदेशातील अनेक संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मंगळवारी दिल्लीत ओमिक्रॉनचे 4 रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे दिल्लीतील (Delhi Omicron Variant) रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 20 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या ओमिक्रॉन प्रकारावरील कोव्हिड लसींच्या (Covid Vaccine) प्रभावाबाबत केलेल्या नवीन रिसर्चमुळे चिंता आणखी वाढू शकते. - Corona New Variant Omicron Wave Affect Uk To India Vaccine Appears To Be Less Effective
कोरोनावर झालेल्या संशोधनातून (Research on Corona) असे समोर आले आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकारापासून संरक्षण करण्यात सध्याची लस कमकुवत आहे. पण, त्याचे परिणाम गंभीर आजारांवर चांगले दिसून आले आहेत. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सांताक्रूझचे बिली गार्डनर आणि मार्म किलपॅट्रिक यांनी कोरोनावरील डेटा समाविष्ट करणारे कंप्युटर मॉडेल विकसित केले आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारापासून संरक्षण इतर प्रकारांच्या तुलनेत खूपच कमी असण्याची शक्यता आहे, पण दिलासा म्हणजे, ही लस अजूनही गंभीर आजारापासून संरक्षण प्रदान करण्यास सक्षम आहे.
लस गंभीर रोगांपासून संरक्षण प्रदान करते
या अहवालानुसार, Pfizer/BioNTech आणि Moderna लसींचे दोन डोस Omicron विरुद्ध लक्षणात्मक प्रकरणांमध्ये केवळ 30% प्रभाव दाखवत आहेत. तर डेल्टा व्हेरियंटविरोधात ते 87% पर्यंत होते. तर, बूस्टर डोसनंतर, ते Omicron वर 48% पर्यंत प्रभावी असू शकते. या अहवालानुसार, ही लस Omicron मुळे होणाऱ्या गंभीर आजारापासून 86% संरक्षण देऊ शकते. बूस्टर डोसनंतर ते 91% पर्यंत असू शकते.
जगात कुठे ऑमिक्रॉनचे किती रुग्ण?
भारत : भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनची 45 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंगळवारी दिल्लीत आणखी चार जणांना कोरोनाच्या ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याआधी सोमवारी महाराष्ट्रात दोन पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले होते. आतापर्यंत महाराष्ट्रात 20, राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 3, गुजरातमध्ये 4, केरळमध्ये 1, आंध्र प्रदेशमध्ये 1, दिल्लीत 6 आणि चंदीगडमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.
ब्रिटन : ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत येथे 4700 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सर्वाधिक प्रकरणे इंग्लंडमध्ये समोर आली आहेत. ओमिक्रॉनचा पहिला मृत्यू यूकेमध्येच झाला आहे. येथे ऑमिक्रॉनची लागण झालेले 10 लोक रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, यूकेने लवकरच आणखी 100 लसीकरण साइट उघडण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये सरकार सातत्याने लोकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करत आहे. ब्रिटनमध्ये, 20% प्रकरणे इंग्लंडमध्ये आढळून आली आहेत.
अमेरिका : अमेरिकेतील 30 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत. आतापर्यंत येथे 159 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे न्यू यॉर्कला मागे टाकून टेक्सास हे ओमिक्रॉनपासून सर्वाधिक संक्रमित राज्य बनले आहे. टेक्सासमध्ये ओमिक्रॉनची 36 प्रकरणे समोर आली आहेत. अमेरिकेत झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता प्रशासनाने बुस्टर डोसचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.