PM Narendra Modi Corona Virus Meeting  Saam TV
देश विदेश

Corona Virus : कोरोनानं टेन्शन वाढवलं! भारतात पुन्हा मास्कसक्ती? PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने कोरोना संदर्भात बैठक बोलावली आहे.

Satish Daud

PM Narendra Modi Corona Virus Meeting : मागील काही जगभरात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. चीनमध्ये कोरोनाने अक्षरश: धूमाकुळ घातला आहे. चीनमधील वाढती रुग्णसंख्या पाहता जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. भारतातही दोन नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने कोरोना संदर्भात बैठक बोलावली आहे. (Latest Marathi News)

चीनमध्ये आणि अमेरिकेत कोरोना व्हायरसने (Corona Virus) कहर केला आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांनाही आता कोरोनाबाबत जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण चीनमध्ये ज्या BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या व्हायरची भारतात देखील एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत.

गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारल अलर्ट झालं आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

याआधी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या कोरोनाची प्रकरणे वाढत नाहीत, परंतु त्याचे प्रकार ओळखण्यासाठी पाळत ठेवणे आणि ट्रॅक करणे आवश्यक आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी बैठकीत सांगितले की, आतापर्यंत केवळ 27-28 टक्के लोकांनीच कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. ते म्हणाले की गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: वृद्धांनी मास्क घालावे जेणेकरून संसर्ग टाळता येईल. दरम्यान, चीन आणि अमेरिकेतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT