Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घट, गेल्या 24 तासांत 2 लाख 34 हजार 281 रुग्णांची नोंद  Saam TV
देश विदेश

Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घट, गेल्या 24 तासांत 2 लाख 34 हजार 281 रुग्णांची नोंद

Coronavirus Cases Today in India मागील २४ तासामध्ये देशात कोरोनाचे २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण आढळले असून ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: देशामध्ये कोरोनाच्या (Corornavirus) रुग्णांमध्ये घट होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे (corona) २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण (Patient) आढळले आहेत. त्यामध्ये ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रोजच्या सकारात्मकता दर (Positivity Rate) आता १४.५० टक्क्यांवर आला आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ४ कोटी १० लाख ९२ हजार ५२२ झाली आहे. (corona cases india today 234281 new cases 893 deaths recorded last 24 hour)

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख ८४ हजार ९३७ वर आली आहे. कोरोनाने जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ९४ हजार ९१ इतकी झाली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ७८४ लोक बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख १३ हजार ४९४ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत (Corona Vaccination) आतापर्यंत १६५ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे (vaccines) डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये ६२ लाख २२ हजार ६८२ डोस देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत १६५ कोटी ७० लाख ६० हजार ६९२ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT