husband and wife case News AI
देश विदेश

Crime : ३ पत्नींसोबत राहायचं होतं, २ सवतीसोबत राहण्यास तिसरीचा नकार, नवऱ्याने असं काही केलं की बायकांच्या पायाखालची जमीनच सरकली

husband and wife case News : ज्ञानेंद्र पांडेय याच्या तिसऱ्या पत्नीने दोन सवतीसोबत घरात राहण्यास राहण्यास नकार दिला. नवऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, यामुळे धक्कादायक घटनेची चर्चा होतेय.

Namdeo Kumbhar

husband and wife case : एक, दोन नव्हे तीन पत्नीसोबत राहायचे होते. पण एकीने नकार दिला, प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहचले, त्यावेळी नवऱ्याने जे केले, त्यामुळे तिन्ही पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. मध्य प्रदेशमधील ज्ञानेंद्र पांडेय यानं पोलीस स्टेशनसमोरच विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशमधील या अजब गजब प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मध्य प्रदेशमधील रीवा शहरात हे अजब प्रकरण समोर आलेय. ज्ञानेंद्र पांडेय याच्या तिसऱ्या पत्नीने दोन सवतीसोबत घरात राहण्यास राहण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, अन् विष घेत आय़ुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्याची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे बोलले जातेय. तीन पत्नीच्या वादामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले.

रिवा शरातील ज्ञानेंद्र पांडेय याने एक दोन नव्हेत तीन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीचे नाव सुशीला, दुसऱ्या पत्नीचे नाव सुनीता आणि तिसऱ्या पत्नीचे नाव सुमन असे आहे. सुशीला आणि सुनीता एकत्र राहतात, पण सुमन वेगळे राहत होते. ज्ञानेंद्र पांडेय याने तिन्ही पत्नीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले, पण तिसरी पत्नी सवतीसोबत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे ज्ञानेंद्र पांडेय याने टोकाचे पाऊल उचलले.

सुनीता आणि सुशीला यांच्यासोबत राहिल्यानंतर पती व्यवस्थित लक्ष ठेवत नसल्याचे तिसऱ्या पत्नीचे म्हणणे आहे. त्यामुळे सुमन वेगळे राहत होती. यामुळेच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. समजूत काढण्यासाठी पोलिसांनी पती-पत्नीला पोलीस स्टेशनला बोलवले होते. पण पोलिसांनी काही सांगण्याआधीच ज्ञानेंद्र पांडेय याने विष प्राशन केले.

पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्ञानेंद्र पांडेय आणि सूमन यांच्यामध्ये चर्चा झाली. दीर्घ चर्चेनंतरही तोडगा निघालाच नाही. सुमन दोन्ही सवतीसोबत राहण्यास तयार नव्हती. वारंवार सांगूनही बायको ऐकायला तयार नाही, त्यामुळे ज्ञानेंद्र पांडेय याने पोलीस स्टेशनच्या बाहेरच विष घेतले. नवऱ्याने विष घेताच बायकोच्या पायाखालची जमीनच सरकरली. तिला क्षणभर काहीच समजत नव्हते. ज्ञानेंद्र पांडेय याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लेणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

SCROLL FOR NEXT