Chhattisgarh Assembly Election 2023 Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Election: छत्तीसगडमध्ये काँग्रेसची यादी तयार, उद्या उमेदवारांची नावे होणार जाहीर? मुख्यमंत्री बघेल म्हणाले...

Chhattisgarh Assembly Election: छत्तीसगडमध्ये काँग्रेसची यादी तयार, उद्या उमेदवारांची नावे होणार जाहीर? मुख्यमंत्री बघेल म्हणाले...

Satish Kengar

Chhattisgarh congress list, Bhupesh Baghel: 

छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. येथे दोन टप्प्यात (७ आणि १७ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने ९० पैकी ८५ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अशातच काँग्रेस पक्ष उद्या (रविवार) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी सांगितले.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी सांगितले की, पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली जाईल. बघेल म्हणाले, उद्यापासून नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे. मी याच्या सर्वांना आगाऊ शुभेच्छा देतो. उद्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल.

पत्रकारांनी मुख्यमंत्री बघेल यांना विचारलं की, रविवारी सर्व ९० उमेदवारांची घोषणा होणार का? यावर ते म्हणाले, 'नाही, ही पहिली यादी असेल. दुसऱ्या टप्प्यासाठी दुसरी यादी नंतर जाहीर केली जाईल.''  (Latest Marathi News)

राजनांदगाव जागेवर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या पक्षाच्या रणनीतीबद्दल विचारले असता बघेल म्हणाले, 'उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर पक्ष आपली रणनीती उघड करेल. यादी जाहीर झाल्यानंतर रमण सिंह यांच्या विरोधात कोण लढणार हे कळेल.''

दरम्यान, पहिल्या टप्प्यात राज्यातील २० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी १९ जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. भाजपकडे एक जागा आहे (राजनांदगाव) ज्याचे प्रतिनिधित्व रमण सिंह करत आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजनांदगावमधून करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली होती. ज्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत करुणा शुक्ला यांचा रमण सिंह यांनी १६,९३३ मतांनी पराभव केला. करुणा शुक्ला यांचे २०२१ मध्ये निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT