Congress Suspends Over 200 Leaders Saam Tv
देश विदेश

Political News: मोठी बातमी! काँग्रेसकडून एकाचवेळी २०० नेत्यांचं तडकाफडकी निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress Suspends Over 200 Leaders: काँग्रेसने मोठी कारवाई करत २०० नेत्यांचं तडकाफडकी निलंबन केले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Priya More
  • काँग्रेसकडून २०० हून अधिक नेत्यांचे निलंबन

  • इंडिया आघाडीच्या महारॅलीला गैरहजर राहिल्याने काँग्रेसकडून कारवाई

  • व्होट बचाओ देश बचाओ महारॅलीला गैरहजर नेत्यांवर कारवाई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने २०० नेत्यांचं तडकाफडकी निलंबन केले. १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या इंडिया आघाडीच्या महारॅलीमध्ये सहभागी न झाल्याने काँग्रेसने ही मोठी कारवाई केली. व्होट बचाओ, देश बचाओ महारॅलीला उपस्थित न राहिल्याने ७ राज्यांमधील २०० हून अधिक नेत्यांना काँग्रेसकडून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने गुजरातमधीस ४९, पश्चिम बंगालमध्ये २६, उत्तर प्रदेशात ११, तेलंगणामध्ये १४, हरियाणात १०, मध्य प्रदेशात ६० आणि झारखंडमधील ३२ नेत्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिव-स्तरीय नेत्यांचा समावेश आहे.

इंडिया आघाडीच्या महारॅलीकडे दुर्लक्ष करण्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात हे अधिकारी अपयशी ठरल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. इतर राज्यांतील काही नेत्यांवर देखील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात मध्य प्रदेश युवक काँग्रेसने सांगितले की, भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करून ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय युवक काँग्रेसने सर्व राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय नेत्यांना मोर्चात सहभागी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले होते. काँग्रेसने आपल्या सर्व नेते, पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या उपस्थितांना 'विथ आयवायसी' या अधिकृत आयवायसी ॲपवर नोंदणी करण्यास सांगितले होते त्यांच्या उपस्थितीवर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी मिंटो रोडवरील संमेलनस्थळी बारकोड स्कॅनरही बसवण्यात आले होते. यातूनच हे नेते महारॅलीला उपस्थित राहिले नसल्याचे दिसून आले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच ग्राहकांना झटका! तूप-बटरच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर|VIDEO

Maharashtra News Live Update: पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत मोठी वाहतूक कोंडी

लाडकी बहीण योजना E-KYC मुदत वाढणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार; गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास रखडला? १५ दिवसांनंतरही गूढ कायम, ३ निकटवर्तीय फरार

SCROLL FOR NEXT