Congress news Saam tv
देश विदेश

काँग्रेसची मोठी कारवाई, ५ आमदार तडकाफडकी निलंबित; राजकीय वर्तुळात खळबळ

Congress action on MLAs : हरियाणा काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने ५ आमदारांना तडकाफडकी निलंबित केलं आहे.

Vishal Gangurde

हरियाणा काँग्रेसकडून मोठी कारवाई

क्रॉस व्होटिंगच्या आरोपावरून ५ आमदार निलंबित

५ आमदार निलंबित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हरियाणा काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पक्षाने राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ५ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. पक्षात अंतर्गत शिस्त राखण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी कारवाईचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी सांगितलं की, '५ आमदारांना पक्षातील प्राथमिक सदस्य पदापासून तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. संघटनात्मक शिस्तीच्या उल्लंघनाचं गांभीर्य लक्षात घेऊन पक्षाने निर्णय घेतला आहे.

राव नरेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे की, 'आमदारांवर ही कारवाई प्रदेश कमिटीच्या सूचनेनंतर करण्यात आली आहे. आदारांवर कारवाई करण्यासाठी आधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची परवानगी घेण्यात आली आहे. 'पक्षाच्या पातळीवरून ही कडक कारवाई करण्यात आली आहे, असा संदेश कारवाईने देण्यात आला आहे.

शैली चौधरी, रेणु बाला, मोहम्मद इलियास पुनहाना, मोहम्मद इस्त्रायल आणि जनरैल सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. सर्व आमदार अनुक्रमे नारायणगढ, सढौरा, रतिया, पुनहाना आणि हथीन विधानसभा मतदारसंघातील आहे. या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अधिकृत उमेदवाराऐवजी दुसऱ्या उमेदवाराला मतदार केल्याचा ठपका त्यांच्याविरोधात आहे. त्यांनी केलेली कृती पक्षाला मान्य नसल्याचे म्हणत कारवाई केल्याचे काँग्रेसचे म्हणणं आहे.

काँग्रेस घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने निलंबनाची कारवाई करून पक्षात शिस्त राखण्यासाठी पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाने हरियाणाच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT