Bharat Jodo Nyay Yatra Saam Tv
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra: 'न्याय का हक मिलने तक', काँग्रेच्या भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो आणि टॅगलाईन लॉन्च

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू होत आहे.

Satish Kengar

Bharat Jodo Nyay Yatra News:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू होत आहे. याबद्दल बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, या यात्रेच्या माध्यमातून देशाच्या मूलभूत सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो आणि टॅगलाइन “न्याय का हक मिलने तक” लॉन्च केली आहे.

ते म्हणाले, "आम्ही 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहोत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मणिपूरमधील इंफाळ येथून सुरू होणार आहे. पुढे ही यात्रा देशातील 15 राज्यांमधून जाणार असून ती मुंबईत संपेल. यात 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभेच्या जागा असतील कव्हर केली जाणार आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचबद्दल ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, "आम्ही आमच्या लोकांवरील होणाऱ्या अन्याय आणि अहंकाराविरुद्ध न्यायाचा नारा देत परत येत आहोत." त्यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी म्हणाले, "मी या सत्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतो. हा प्रवास सुरूच राहणार आहे."  (Latest Marathi News)

छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय ठाकूर यांनी यापूर्वी सांगितले होते की, ही यात्रा 67 दिवसांत 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापेल. ते म्हणाले की, ही यात्रा 16-17 फेब्रुवारीनंतर छत्तीसगडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि पाच दिवसांत राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश करेल, जिथे आदिवासी लोकसंख्या सुमारे 32 टक्के आहे.

ते म्हणाले, लोकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी काँग्रेस सत्याग्रह हे एक मजबूत शस्त्र मानते आणि भारत जोडो न्याय पदयात्रा हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वात मोठा आणि परिवर्तनकारी सत्याग्रह ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

SCROLL FOR NEXT