Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांनी 'मौनी बाबा' म्हणत PM मोदींवर साधला निशाणा; म्हणाले...

काँग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न केले.

Vishal Gangurde

mallikarjun kharge News : काँग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न केले. देशात सुरू असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावरून खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मौनी बाबा म्हणत प्रश्नांना उत्तर देण्याचे आव्हान यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. (Latest Marathi News)

मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर राज्यसभेत एकच गोंधळ पाहायला मिळाला. खरगे यांनी गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्यावरून सवाल उपस्थित केले. तसेच अदानी समूह वादावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

काँग्रेस (Congress) अध्यक्ष, खासदार मल्लिकार्जुन खरगे अदानी वादावर म्हणाले, एका व्यवसायाची संपत्ती ५० हजार कोटी होती. तिच संपत्ती २०१९ मध्ये १ लाख कोटी झाली. दोन वर्षात असं काय झालं की, संपत्ती १२ लाख कोटी झाली. असा कोणता चमत्कार झाला, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांचे ३१ पैसे जरी बाकी असले तरी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. पण उद्योजकांचे ९००० कोटी रुपये माफ होतात, अशी टीकाही त्यांनी केली.

खरगे पुढे म्हणाले, 'आज समाजात द्वेष पसरवला जात आहे. देशातील काही लोकप्रतिनिधी त्याला प्रोत्साहन देत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रश्न विचारू इच्छितो की, तुम्ही गप्प का आहात? तुम्ही सर्वांना घाबरवता का, तुमची एक नजर त्यांच्यावर पडली की, ते समजत असतील की आगामी निवडणुकीत तिकीट मिळणार नाही. तुम्ही मौनी बाबा बनून बसला आहात, यामुळे ही परिस्थिती झाली आहे. तुम्ही द्वेष पसरवणाऱ्यांना तिकीट देऊ नका, तेव्हा सर्व सरळ होतील'.

खरगे पुढे म्हणाले, अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जाते. तर काही ठिकाणी अनुसूचित जातीतील व्यक्ती मंदिरात गेल्यावर त्याला मारहाण केली जाते. अनुसूचित जातीतील व्यक्ती हिंदूच असेल, तर त्याला मंदिरात प्रवेश का नाकारला जातो? मंत्री आणि आमदार फक्त देखाव्यासाठी त्यांच्या घरी जाऊन जेवण करून फोटो काढतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT