Rahul Gandhi saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: वाह राहुलजी वाह! चार तासात राहुल गांधींनी बनवला टेबल; फर्निचर मार्केटमधील कारागिरांसोबत केलं जेवण

Rahul Gandhi: वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधींनी आज दिल्लीमधील कीर्तीनगरमधील फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली.

Bharat Jadhav

Rahul Gandhi visit Furniture Market:

वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधींनी आज दिल्लीमधील कीर्तीनगरमधील फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली. हे कारागीर कसे काम करतात, याचे बारकावे देखील त्यांनी जाणून घेतले. यावेळी राहुल गांधींनी कारागिरांच्या मदतीनं चार तासात टेबल तयार केला. राहुल गांधींची ही कृतीने अनेकांची मने जिंकली आहेत. फर्निचर काम करणाऱ्या कारागिरांचे काम कसे चालते त्यांच्या कामातील बारकावे व्यवस्थितपणे समजून घेणाऱ्या राहुल गांधींचं लोकांकडून कौतुक केलं जातंय. (Latest Politics News)

राहुल गांधींनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर फर्निचर काम करणाऱ्या कारागिरांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, आज दिल्लीमध्ये असलेल्या कीर्तीनगर येथील आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये गेलो. तेथील सुतार बांधवांची भेट घेतली. हे लोक मेहनती असण्यासोबतच ते एक अप्रतिम कलाकार, आणि सौंदर्य कोरीव काम करण्यात निपुण आहेत. यांच्यासोबत खुप गप्पा झाल्या काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राहुल गांधींनी फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली. त्यांच्या कामातील बारकावे जाणून घेतले. तसेच त्यांच्या मदतीने राहुल गांधींनी चार तासात टेबल तयार केला. फर्निचरचे वर्कशॉप राम दयाळ यांचे आहे. या वर्कशॉपमध्ये रामजीवन,राम ललित आणि राम दयाल यांनी राहुल गांधींना टेबल तयार करण्यास मदत केली. हे सर्वजण बिहारचे रहिवासी आहेत. टेबल तयार केल्यानंतर यासर्वांसोबत राहुल गांधींनी जेवणही केले. दरम्यान नेटकरी राहुल गांधींचं कौतुक करत आहेत.

राहुल गांधीचे गुणगान करताना एक नेटकरी म्हणाले की, एका चांगल्या शिकणाऱ्यामध्ये जे गुण हवेत ते सर्व गुण आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी आनंद विहार येथील रेल्वेस्टेशनच्या हमाल लोकांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी हमाल लोकांचे कपडे परिधान केले होते. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

राहुल गांधींनी यावेळी प्रवाशांच्या वस्तू डोक्यावर घेतल्या होत्या. तर काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी दिल्लीच्या एका गॅरेजला भेट दिली होती. तेथेही त्यांनी मोटारसायकल दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांची भेट घेत त्यांच्याशी गप्पा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT