Congress Leader Raja Pateriya Arrested Saam TV
देश विदेश

Narendra Modi : PM 'मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरियां यांना पोलिसांनी अटक केली आहे.

साम वृत्तसंथा

Congress Leader Raja Pateriya Arrested : काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरियां यांना पोलिसांनी अटक केली आहे. राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी पटेरिया यांना दमोह येथील हट्टा येथून पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

मध्यप्रदेश काँग्रेसचे (Congress) माजी आमदार राजा पटेरिया हे रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संविधान वाचवायचं असेल, तर मोदींची (PM Narendra Modi) हत्या करण्यासाठी तयार राहा, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच, भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी पटेरिया यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला होता. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पन्ना पोलिसांनी पटेरिया यांच्याविरोधात शांतता भंग आणि असंतोष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच, पटेरिया यांनी यू टर्न घेतला होता. माझ्या बोलण्याचा अर्थ हा पुढच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करा असा होता. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मात्र ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्याने केवळ हाच भाग उचलला आणि व्हिडीओ व्हायरल केला. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. माझं विधान मोडतोड करून दाखवलं गेलं, असं पटेरिया यांनी म्हटलं होत.

दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांनी आज सकाळी (13 डिसेंबर) राजा पटेरिया यांना ताब्यात घेतलं आहे. पटेरिया यांना दमोह येथील हट्टा येथून पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आता लवकरच त्यांना न्यायालयातही हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

SCROLL FOR NEXT