Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi News : अमेरिकेतील कार्यक्रमात अँकरकडून 'माजी खासदार' म्हणून ओळख, त्यावर राहुल गांधीची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले...

Rahul Gandhi News : भारतात सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. आज ते स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सामील झाले होते.

यावेळी त्यांनी आपली खासदारकी रद्द झाल्याबद्दल मत मांडलं. मी कधी विचार केला नव्हता माझ्यासोबत असं काही होईल. भारतात मानहानीच्या प्रकरणात सर्वात जास्त शिक्षा झालेला कदाचित मीच असेल, असं राहुल गांधींनी मिश्किलपणे म्हटलं.

पुढे राहुल गांधी यांनी म्हटलं की, आता कार्यक्रमात माझी ओळख माजी खासदार म्हणून करण्यात आली. मी जेव्हा 2004 साली माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं नव्हतं भारतात असं चित्र कधी निर्माण होईल.

खासदारकी रद्द झाल्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, माझ्याकडे आता मोठी संधी आहे. कदाचित संसदेत बसण्यापेक्षाही सध्याची संधी मोठी आहे.

सरकार यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जनतेचे प्रश्न मांडत आहोत. मात्र सरकारकडून आम्हाल कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि भारत जोडा यात्रेची सुरुवात झाली.  (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी दावा केला की, भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये जाताना प्रशासनाने मला सांगितले की तुम्ही तिथे गेलात आणि 4 दिवस चाललात तर तुमचा जीव जाऊ शकतो. यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं की, मला पाहायचे आहे की माझ्यावर ग्रेनेड कोण फेकेल. समोरच्या व्यक्तीकडे किती सामर्थ्य आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु तुम्ही खंबीर असले पाहिजे, असंही राहुल गांधींनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा - अमित शहा

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT