Congress likely to change seven state presidents before elections saam tv
देश विदेश

महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Congress To Undergo Major Reshuffle: काँग्रेस पक्ष सात राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि काही राज्य प्रभारी बदलण्याच्या तयारीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणे आणि निवडणूक रणनीती अधिक प्रभावी बनवणे हा उद्देश आहे.

Bharat Jadhav

  • काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची तयारी सुरू असल्याची चर्चा.

  • सात राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार.

  • दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांतील प्रभारीही बदलण्याची शक्यता.

भाजपनंतर काँग्रेसमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. निवडणुका लागण्याआधी भाजप ज्याप्रकारे कामाला लागते. आपली रणनीती ठरवते, त्याचप्रमाणे काँग्रेस नेहमी इलेक्शन मोडमध्ये राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केली जाणार आहेत. विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करणे, मोर्चेबांधणीसाठी पक्षात उच्चस्तरीय फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे.

पक्षातील हायकमांड दिल्ली आणि राजस्थानसह अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींना बदलण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्व गेल्या काही काळापासून तळागाळातील पक्षाची संघटना मजबूत केली जाणार आहे. यासाठी पक्ष सक्रियपणे काम करत आहे. राज्य काँग्रेस अध्यक्ष आणि प्रभारी पदांवरील संभाव्य बदल हे त्याच धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहेत.

दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत

काँग्रेस पक्ष आता दक्षिण भारतावर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. संघटनेला अधिक सक्रिय करण्यासाठी आणि निवडणुकीतील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी नवीन नेतृत्वाची जबाबदारी देणे, हा यामागील उद्देश आहे.

काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल

काँग्रेस आपल्या संघटनात्मक रचनेत केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे, तर प्रभारी स्तरावरही बदल करण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडू आसाम आणि महाराष्ट्रासाठी नवीन प्रभारींचीही लवकरच नियुक्ती केली जाऊ शकते. राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करणे, समन्वय सुधारणे आणि प्रभावी निवडणूक रणनीती सुनिश्चित करणे यासाठी नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत, असे पक्षाच्या हायकमांडला वाटते.

पंजाबपासून ते छत्तीसगडपर्यंत बदल होण्याची शक्यता

दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाबमधील प्रदेशाध्यक्षांना बदलण्याबाबत पक्षात चर्चा आहे. संघटनात्मक गरजा लक्षात घेत, तेथे नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. यासह काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता

केरळ

तामिळनाडू

कर्नाटक

दिल्ली

पंजाब

छत्तीसगड

राजस्थान

या राज्यातील प्रभारी बदलले जाणार

आसाम

तमिळनाडू

महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या इंदापूर येथे एसटी चालकाला भररस्तात मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर हल्ला; राजकारणात खळबळ

Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Kalyan : पाण्याच्या बाटलीवरून मध्यरात्री धिंगाणा, हॉटेल चालकाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT