Congress leaders announce candidates as party takes independent stand in West Bengal elections amid INDIA alliance tensions. Saam Tv
देश विदेश

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ऐन निवडणुकीत इंडिया आघाडी फुटली, काँग्रेसनं पकडली वेगळी वाट

India-Alliance Split Congress Contests Alone West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 284 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बंगालमध्ये एकूण 294 जागा असून काँग्रेस या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मात्र 10 जागांसाठीचे उमेदवार अद्यापह जाहीर केले नाहीये. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली असून अधीर रंजन चौधरी हे 30 वर्षानंतर ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना बहरामपुरमधून तिकीट देण्यात आले आहे.

मालतीपूरमधून मौसम नूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसची युती होण्याची चर्चा सुरू होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी युती करण्यास नकार दिल्याने काँग्रेस त्यावेळी देखील स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी देखील कॉँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेसने भवानीपूर मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने या जागेसाठी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने हेमताबादमधून अनामिका राय, जांगीपूरमधून मोहम्मद इम्रान अली, तुफानगंजमधून देवेंद्रनाथ आणि दिनहाटामधून हरिहर राय यांना उमेदवारी दिली आहे.

इंडिया आघाडी म्हणून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हा एकत्र आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडी फुटली आहे का? अशा चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT