Congress Demands Gyanesh Kumar’s Resignation; Cwc Takes Up Sir And Voter Roll Issue saam tv
देश विदेश

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन? काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची आक्रमक भूमिका

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी आता काँग्रेस आक्रमक झालीय.काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसनं ज्ञानेश कुमारांविरोधात काय प्लॅन आखलाय? राहुल गांधींनी काय भूमिका घेतलीय? पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी देशभरात काँग्रेसनं आंदोलनाचं हत्यार उपसलयं.अशातच दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याबद्दल आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींनी देशव्यापी आंदोलनाचा कसा इशारा दिलाय,पाहूयात.

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पंतप्रधान स्वतः त्यांना राजीनामा द्यायला लावतील. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तरी चालेल, नाही दिला तर अधिक चांगलं. कारण आमचे आंदोलन सुरूच राहील. जोपर्यंत ज्ञानेश कुमार जात नाहीत, तोपर्यंत आम्ही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहू. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर रामलीला मैदानावर किंवा राज्यात कुठे मोर्चे काढायचे हे ठरवले जाईल. इंडिया आघाडीच्या बैठकीत रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा प्रस्ताव ठेवला जाईल.

दरम्यान खासदार प्रियंका गांधींनीही ज्ञानेश कुमार कसा राजीनामा देणार नाहीत? असा सवाल बैठकीत उपस्थित केलाय. त्याव्यतिरिक्त काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणत्या तीन मागण्यांवर काँग्रेस नेत्याचं एकमत झालंय. पाहूयात.

काँग्रेसच्या 3 मागण्या

1 ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

2 SIR रद्द करण्यात यावा, मतदार यादीतून वगळलेली 13 कोटी नावे पुन्हा समाविष्ट करावीत

3 पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी याची जबाबदारी घ्यावी

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक

30 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीच्या एक दिवस आधीच काँग्रेसनं आपल्या कार्यकारिणीची बैठक घेऊन केंद्र सरकार आणि ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आक्रमक रणनीती आखल्याची चर्चा आहे.

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेस इंडिया आघाडीचा संयुक्तपणे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर इतर पक्ष काय मुद्दे मांडतात आणि काँग्रेस त्यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण

लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT