यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींचा हात मुरडत कपडे ओढल्याचा कॉंग्रेसचा आरोप twitter/@INCUttarPradesh
देश विदेश

यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींचा हात मुरडत कपडे ओढल्याचा कॉंग्रेसचा आरोप

कॉंग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांचा यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ: कॉंग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी (Congress MP Priyanka Gandhi) यांचा यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) धक्काबुक्की केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. यावेळी त्यांना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात मुरडला (grabbed Hand) आणि कपडेही ओढले (pulled her clothes) असा आरोप करत उत्तर प्रदेश कॉंग्रेसने याबाबतचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. प्रियंका गांधी आज तिकुनियातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी जाणार होत्या. (Congress alleges that UP police grabbed Priyanka Gandhi's hand and pulled her clothes)

हे देखील पहा -

उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात झालेल्या संघर्षामुळे काही शेकतऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रियंका गांधी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होत्या, मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखनऊमध्येच रोखलं आणि घरात नजरकैद केलं. त्यानंतर त्या पायी चालत घराबाहेर निघाल्या आणि नंतर कारने प्रवास करु लागल्या. तेव्हा लखनौहून लखीमपूर खेरीच्या मार्गावर टोल प्लाझावर पोलिसांचा बंदोबस्त असून प्रियंका गांधी, कॉंग्रेस कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना रोखण्यासाठी यूपी पोलिसांनी ट्रक उभे करत रस्ता ब्लॉक केल्याचा आरोप यूपी कॉंग्रेसने केला आहे.

पोलिसांना अडवले असता प्रियंका गांधी पोलिसांना म्हणाल्या की, ''मी घराबाहेर पडून गुन्हा करत नाही. मला फक्त पीडित कुटुंबांना भेटायचे आहे आणि त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे. मी काय चूक करत आहे? आणि जर मी काही चूक केली असेल, तर तुमच्याकडे ऑर्डर किंवा वॉरंट असायला हवे. तुम्ही मला थांबवत आहात, पण कोणत्या कारणासाठी?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याबाबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, ''काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीजींना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा जाहीर निषेध! उत्तर प्रदेश मध्ये असूरराज सुरू आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले जाते, विरोधकांचा आवाज पोलिसांकडून जबरदस्तीने दाबला जातो. भाजपा लोकशाही व जनतेला पायदळी तुडवत आहे. जनतेने जागृत व्हावे''

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, ''एक नागरिक म्हणून मला वाटते की सीटिंग जजच्या समितीने न्यायालयीन चौकशी केली पाहिजे. त्याआधी, केंद्रीय मंत्र्याला चौकशी दरम्यान कमीत-कमी बरखास्त किंवा निलंबित केले पाहिजे कारण ही घटना त्यांच्या ताफ्याच्या संदर्भात घडली आहे.''

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT