Congress Candidates List Saam tv
देश विदेश

Congress Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 8वी यादी जाहीर, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याविरोधात कोणाला उतरवलं रिंगणात?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह चार राज्यांतील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024: 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह चार राज्यांतील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये राव यादवेंद्र सिंह यांना मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या जागेवरून भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसच्या या यादीत एकूण 14 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. झारखंडच्या खुंटी मतदारसंघातून कालीचरण मुंडा, लोहरदगामधून सुखदेव भगत, हजारीबागमधून जयप्रकाश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील दमोहमधून तरवर सिंह लोधी आणि विदिशामधून प्रताप भानू शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर गाझियाबादमधून डॉली शर्मा, बुलंदशहरमधून शिवराज वाल्मिकी, सीतापूरमधून नकुल दुबे, महाराजगंजमधून वीरेंद्र चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या आठव्या यादीत तेलंगणातील चार उमेदवारांचीही नावे आहेत. आदिलाबादमधून सुगुणा कुमारी, निजामाबादमधून तातीपर्थी जीवन रेड्डी, मेडकमधून नीलम मधु आणि भोंगीरमधून किरण कुमार रेड्डी यांना तिकीट देण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

याआधी मंगळवारी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी छत्तीसगडमधील चार आणि तामिळनाडूमधील एका उमेदवारासह पाच उमेदवारांची घोषणा केली होती. आर सुधा यांना तामिळनाडूच्या मायलादुथुराई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मायलादुथुराई ही जागा त्यांच्या मित्रपक्ष डीएमकेकडे होती.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर याआधी तीनवेळा या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने सुरगुजामधून शशी सिंह, रायगडमधून मनेका देवी सिंह, बिलासपूरमधून देवेंद्र सिंह यादव आणि कांकेरमधून बिरेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT