condom Cafe Saamtv
देश विदेश

Condom Cafe : चर्चा फक्त कंडोम कॅफेची! जिकडे तिकडे कंडोम, बाहेर पडताना गिफ्टमध्येही कंडोम; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

कंडोमची थीम देण्यात आलेल्या या कॅफेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bankok News: कंडोम हा शब्द कानावर पडला तरी ऐकनारा कान टवकारतोच, आणि बोलणाराही थोडासा चाचपडतोच. कारण या विषयी कितीही मुक्तपणे चर्चा व्हाव्या म्हणल्या तरी आजही याबद्दल बोलताना विचार करावा लागतो. पण सध्या एका कॅफेची सर्वत्र तुफान चर्चा होताना दिसत आहे, त्याचे कारणही तसेच आहे.

या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला संपूर्णपणे कंडोमची थीम देण्यात आली आहे. खास ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी या कॅफेची अशी सजावट करण्यात आली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Viral Video)

सोशल मीडियावर चर्चेत असलेला हा कंडोम कॅफे थायलंडमधील आहे. या कॅफेमध्ये अगदी रंगीबेरंगी सजावट पाहायला मिळते. ज्यामध्ये अनेक ठिकाणी कंडोमसह अन्य गर्भनिरोधकांच्या उत्पादनाची सुद्धा जाहिरात करण्यात आली आहे. तुम्ही कॅफेमध्ये प्रवेश घेता तेव्हा बाजूला काही पोस्टर्स व व्हिज्युअल्स पाहायला मिळतात. यात सेक्स, कौटुंबिक नियोजन याविषयांवर जागरूकता निर्माण करणारे मीम्स व विनोदही लिहले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे या कॅफेतून बाहेर पडताना तुम्हाला एक कंडोमही मोफत दिला जातो.

दरम्यान इंस्टाग्रामवर (Instagram Post) हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून कंडोम आणि कॅबेज असे या कॅफेचे नाव आहे. थायलंडमधील बॅंकॉकमध्ये हा कॅफे असल्याचेही व्हिडिओमध्ये नमूद केले आहे. सोहम सिन्हा याने शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

कार्तिक कृष्ण दशमी: आज सिंह राशीवर चंद्राची कृपा; पाहा कोणत्या राशींना मिळणार मोठा लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT