दिल्लीतील ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनीची सामान्य लक्षणे Saam Tv
देश विदेश

दिल्लीतील ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णाला कोरोनीची सामान्य लक्षणे

लसीचे दोन्ही डोस घेतल्याने प्रकृतीला धोका नाही... लक्षणेही सामान्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकार ओमायक्रॉन आता भारतात पसरत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकनंतर ओमायक्रॉनने देशाची राजधानी दिल्लीत पाऊल ठेवले आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दिल्लीत आढळून आला आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतल्याने त्याला कोरोनाची सामान्य लक्षणं दिसून येत आहेत. त्याच्या जीवालाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

टांझानियाहून दिल्लीत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला 'ओमिक्रॉन'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णावर सध्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात म्हणजेच एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये कोरोनाची काही सामान्य लक्षणे आहेत.

एलएनजेपी रुग्णालयातील डॉ. सुरेश कुमार यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार टांझानियाहून आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्याला घसा खवखवणे, अशक्तपणा आणि त्याचे अंग दुखत आहे. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, त्यामुळे त्याला किरकोळ लक्षणे दिसत आहेत आणि त्याची प्रकृती फारशी वाईट नाही. त्यांचे विलगीकरण केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, मुख्यमंत्र्यांसमोरच फोडला बळीराजानं टाहो

SIRवरून निवडणूक आयुक्त भिडले, निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT