नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी कॉक्रोच जनता पार्टी आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. 6 जूनला नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनाची घोषणा झाली असली तरी कॉक्रोच जनता पार्टीला पोलीस परवानगीची प्रतीक्षा आहे. या आंदोलनासाठी पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार आहेत. मात्र त्यांनी आपल्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचं आवाहन केलंय.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कुणी-कुणी पाठिंबा दिलाय ते पाहा...
लडाखमधील पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं.
तसंच, दक्षिणेतील अभिनेते प्रकाश राज यांनी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिलंय.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीही कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला.
तर दुसरीकडे, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिलंय.
इतकंच नव्हे तर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनीही कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिलाय.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कॉक्रोच जनता पार्टीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याआधीच संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतः आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स मिळालेल्या कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलनासाठी पोलीस प्रशासन परवानगी देणार का, हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे.
अभिजीत दिपकेंनी आंदोलनाची हाक दिली असली तरी सोशल मीडियावर जसा समर्थकांचा महापूर आला तसाच दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर येणार का? या आंदोलनात किती तरुण सहभागी होणार? सरकारची याची दखल घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर कॉक्रोच जनता पार्टीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.