Vande Bharat Train News  Saam TV
देश विदेश

Vande Bharat train Food : वंदे भारत ट्रेनमधील जेवणात सापडलं झुरळ; प्रवाशांचा संताप

Vande Bharat train News : प्रवासी आणि त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संताप व्यक्त केला.

प्रविण वाकचौरे, साम टिव्ही ब्युरो

Bhopal News : वंदे भारत ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ग्वाल्हेर येथील एका प्रवाशाला त्याच्या जेवणात झुरळ आढळले. त्याचा फोटो प्रवाशाने ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी ही बाब समोर आली आहे. प्रवासी आपल्या कुटुंबासोबत वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करत होता. भोपाळहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या कोच क्रमांक C-8, सीट क्रमांक 57 वर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पराठे देण्यात आले होते.

या प्रवाशाच्या पराठ्यात झुरळ निघाले आले. या प्रकारामुळे प्रवासी आणि त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत संताप व्यक्त केला. यानंतर  रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी व त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. (Latest Marathi News)

​​तक्रारीनंतर IRCTC ने प्रवाशांसाठी पर्यायी जेवणाची व्यवस्था केली आणि माफीही मागितली. तक्रारीनंतर आयआरसीटीसीने विक्रेत्याला कडक कारवाईचा इशारा दिला आणि दंड ठोठावला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी किचनचे मॉनिटरिंगही वाढवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT