Vijay Darda News Saam tv
देश विदेश

Interim Bail To Vijay Darda: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण! विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

Coal Block Allocation Scam Case: कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणात विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Coal Scam: छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणात विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणात आता महत्वाची बातमी समोर येत असून विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी (१३ जुलै) कोळसा घोटाळाप्रकरणी मोठा निर्णय दिला होता. दिल्ली न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील प्रकरणात माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवत विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.

या प्रकरणात आता दिल्ली उच्च न्यायालयाने विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला अंतरिम जामीन (Interim Bail) दिला आहे. त्यामुळे त्यांना जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी किमान दोन महिन्यांचा दिलासा मिळाला आहे. दर्डा कुटुंबाला सीबीआयच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, या घोटाळा प्रकरणात याआधीही अनेक जण अटकेत आहेत. ज्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT