CNG Hike
CNG Hike Saam Tv
देश विदेश

CNG Price : डिझेलपेक्षा सीएनजी झाले महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे बदल झाले आहेत, पण इंधन कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. पण आज सीएनजी (CNG) च्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही सीएनजी (CNG) च्या दरात बदल झाला आहे. नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग झाले आहे. सीएनजीमध्ये ६ रुपयांनी महाग झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शिअल एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले, तर दुसरीकडे सीएनजी (CNG) गॅसच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या राज्यात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत. (CNG Latest News)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सीएनजीची (CNG) किंमतही पेट्रोलच्या किमतीच्या जवळपास पोहोचली आहे. लखनौमध्ये पेट्रोलचे दर ९६.५७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर १ ऑगस्टपासून लखनऊमध्ये सीएनजी ९६.१० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. सीएनजीच्या किमती पेट्रोलच्या जवळपास पोहोचल्या आहेत.

३१ जुलै रोजी यूपीमध्ये सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या किमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती आणि १ ऑगस्टपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. लखनौमध्ये सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या ग्रीन गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात रु. ५ रुपयांनी तर पीएनजी प्रति किलो ४.७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही सीएनजी (CNG) च्या दरात बदल झाला आहे. नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग झाले आहे. सीएनजीमध्ये ६ रुपयांनी महाग झाले आहे. नागपूरात सीएनजी ११६ रुपये आहे तर पेट्रोल १०६ रुपयांनी मिळत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 28 उमेदवारांचे अर्ज वैध

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT