Rajasthan New CM Saam TV
देश विदेश

Rajasthan New CM : राजस्थानातही छत्तीसगड, मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुणाची नावं?

Rajasthan New CM : विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजपचे तीनही निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.

प्रविण वाकचौरे

Rajasthan New CM :

मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे.

राजस्थानमध्ये हाच पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी चार वाजता होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही राज्यांमध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राजस्थानमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून किंवा महिला प्रवर्गातून नावे निवडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भाजपचे तीनही निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधतील. यावेळी दोन उपमुख्यमंत्रीही केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.  (Latest Marathi News)

सध्या विधिमंडळ पक्षाबाहेरून मुख्यमंत्री निवडून येण्याची शक्यता नगण्य असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदारांच्या यादीत वसुंधरा राजे, दिया कुमारी, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, अश्निनी वैष्णव, सीपी जोशी, ओम माथूर आणि इतर काही नावांचा समावेश आहे.

आमदारांना जयपूरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपने अपक्ष आमदारांनाही जयपूरमध्येच राहण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याबाबत काही अपक्षांकडून शपथपत्रेही घेण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT