देश विदेश

WATCH Video: नितीश कुमारांचं भर विधानसभेत वादग्रस्त विधान; सांगितला लोकसंख्येवर लगाम लावण्याचा विचित्र उपाय

CM Nitish Kumar : महिलांमधील शिक्षणामुळे लोकसंख्या नियंत्रण होते, असं सांगत असताना नितीश कुमार यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Bharat Jadhav

CM Nitish Kumar over population control:

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने अलीकडे जातीनिहाय जनगणना केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे आकडे आज बिहार विधानसभेत सादर केले. आकडे सादर करताना त्यांनी लोकसंख्येवर लगाम लावण्यासाठी भर विधानसभेत उपाय सांगितला. नितीश कुमार या भाषणामुळे वादात सापडले आहेत. भाजपकडून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जातेय. तर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे भाष्य मूर्ख आणि असभ्य असल्याचं म्हटलं जातेय.

महिलांमधील शिक्षणामुळे लोकसंख्या नियंत्रण होते, असं सांगताना त्यांनी नव विवाहित जोडप्यांमधील शारीरिक संबंधाचं कथन केलं. लोकसंख्या वाढीवर उपाय सांगताना त्यांनी केलेल्या मस्तराम कथेमुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीका केली जात आहे.

काय म्हणाले नितीश कुमार?

चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश यांनी बिहारमध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारल्याचे नमूद केलं. मुलींनी शिक्षण घेतल्यास लोकसंख्या नियंत्रणास हातभार लागेल, असे त्यांनी सांगितलं. जेव्हा एखादी स्त्री शिक्षित असते, तिला याची जाणीव असते. त्यामुळे ती आपल्या पतीला सांगू शकते की, शारीरिक संबंधाच्या शेवटी (इजॅक्युलेट). बाहेर करा,” बाकी तुम्ही समजून घ्या. याचमुळे लोकसंख्या कमी होत असल्याचं ते म्हणाले.

नितीश कुमार यांच्या वर्णन कथेवर अनेक आमदारांना हसू आलं तर अनेकांना धक्का बसला. मात्र यावरून भाजप त्यांच्यावर टीका केलीय. सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका केली जातेय. आपल्या भाषणाला पूर्ण करताना नितीश कुमार म्हणाले की, त्या गोष्टीमुळे लोकसंख्या कमी झालीय. आपल्या विधानाला त्यांनी काही आकडेवारीचा दाखला दिला. ते म्हणाले, यापूर्वी, एकूण प्रजनन दर (TFR) 4.3% होता तर गेल्या वर्षी आम्हाला अहवाल प्राप्त झालेल्या (TFR) हा 2.9% वर आला आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान भाजपकडून टीका केली जाते. "भारतीय राजकारणात नितीश बाबूंसारखा स्पष्ट वर्तन कोणीही पाहिला नाही. नितीश बाबूंचे मन बी ग्रेड अॅडल्ट सिनेमांच्या मोहाने डागाळलेले दिसतंय. त्यांच्या दुटप्पी विधानांवर जाहीर निर्बंध असलं पाहिजे, असे दिसते अशी पोस्ट बिहार भाजपकडून करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT