Cm Shinde In NDA Meeting Saam tv
देश विदेश

CM Eknath Shinde : मंत्रिपदाचा निर्णय खासदारांच्या मेरिटनुसार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

CM Eknath Shinde News : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार आहे. तर दुसरे मंत्रिपद नंतर देण्याचं आश्वासन त्यांना मिळालंय. त्यामुळे एका मंत्रिपदासाठी खासदारांची चढाओढ पाहायला मिळत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय गोटात हालचाली वाढल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या खासदारांची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार, याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे. तर काही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. याचदरम्यान, मंत्रिपदाचा निर्णय मेरीटच्या आधारावर होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत घटक पक्षातील १८ जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लावण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे. मात्र, श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.

श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. यानंतर खासदारांचे मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी मी त्यांचा विचार करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलं आहे.

पक्षातील सर्व खासदारांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती.मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं एकूण घेतलं. मात्र, सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच मी निर्णय घेईन, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शिंदे गटातील एका मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूकीसाठी अनेक रस्ते बंद

Mumbai News: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, हात सटकला अन् नाल्यात पडला

Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

Kandyache Thalipith : सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय! 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कांद्याचं थालिपीठ

Kitchen Tips : फोडणी दिल्यानंतर सतत ठसका लागतो? 'हे' 6 उपाय करून पाहा जरासुद्धा येणार नाही खोकला

SCROLL FOR NEXT