CM Eknath Shinde Meets Amit Shah  Twitter
देश विदेश

Eknath Shinde : CM शिंदेंनी रात्री उशिरा घेतली अमित शाहांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

CM Eknath Shinde Meet Amit Shah : राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर शिंदे सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या दिल्लीत बैठका वाढल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शिंदेंनी (Eknath Shinde) गुरूवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा सुरू होती.

शिवसेनेसोबत सुरू असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि दसरा मेळावा अशा महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यासोबत भेट झाली नव्हती. पण रात्री उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

अमित शाह यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नसून सदिच्छा भेट होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

शिंदे गटाची मंत्रिपदावरून नाराजी?

दुसरीकडे शिंदे गटाला मिळालेल्या खात्यांबाबत असमाधानी असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागाशी निगडित एखाद दुसरे खाते मिळावे अशी शिंदे गटातील मंत्र्यांची इच्छा आहे. शिंदे गटाकडे आता कृषी आणि फलोत्पादन ही दोनच खाती ग्रामीण भागाशी सबंधित आहेत. ग्राम विकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते शिंदे गटाला हवे आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप पक्षश्रेष्ठीशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

SCROLL FOR NEXT