Pakistan Violence Latest News Saam TV
देश विदेश

Pakistan Violence : पाकिस्तानात हिंसाचार उफाळला, भूखंडाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; आतापर्यंत ३६ ठार

Pakistan Clash Latest News : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय.

Satish Daud

पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर १६२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या (Pakistan) अप्पर कुर्सम जिल्ह्यात भूखंडावरून दोन गटात वाद सुरू आहे. अगदी पाच दिवसांपूर्वी बोशेरा गावातही दोन गट आमने-सामने आले होते. यात अनेकजण जखमी झाले होते. बोशेरा गावात यापूर्वी धार्मिक गट आणि जातीय संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. तसेच गावावर अनेकवेळा दहशतवादी हल्ले देखील झाले आहेत.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भूखंडाच्या वादातून या भागात पुन्हा दोन गट आमने सामने आले. यावेळी त्यांच्या शा‍ब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर धारधार शस्त्रांनी (Violence) हल्ला चढवला. यात अनेक लोक मारले गेले. तर काहीजण जखमी झाले.

कुर्रमचे उपायुक्त जावेदुल्ला मेहसूद यांनी सांगितले, की जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांत आदिवासींच्या संघर्षात ३६ जण ठार आणि १६२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील इतर काही भागात अजूनही गोळीबार सुरू आहे. युद्धबंदीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

आदिवासी सैनिकांनी खंदक रिकामे केले आहेत. या हिंसाचाराचे पडसाद आजूबाजूच्या परिसरात देखील उमटले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मुख्य रस्त्यांवरही लष्कराचा मोठा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांततात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT