China Tiger urine drink news Freepik
देश विदेश

China : ऐकलं का! चीनी लोक चक्क पितायेत वाघाची लघवी, 250 ml साठी मोजतायेत 600 रुपये

China News : चीनमधील सिचुआन प्रांताच्या एका प्राणी संग्रहालयात वाघाच्या लघवीची विक्री केली जात आहे. संधिवात बरा होईल या आशेने तेथील लोक लघवीचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

China News : चीनमधील एक प्राणी संग्रहालय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातील एका प्राणी संग्रहालयामध्ये वाघाची लघवी विकली जात आहे. लघवीच्या सेवनाने संधिवातासह अन्य आजार बरे होणार असल्याचा दावा केला जात आहे. वाघाची लघवी व्हाइट वाइनसोबत पिणे अधिक फायदेशीर असल्याचेही तेथील अधिकारी म्हणत आहेत.

साउथ मॉर्निंग चायना पोस्टच्या वृत्तानुसार, सिचुआन प्रांतातील के यान बिफेंगक्सिया वाइल्डलाइफ या प्राणी संग्रहालयाने वाघाची लघवी व्हाइट वाइनमध्ये मिसळून प्यायल्या शरीराला फायदा होतो असा दावा केला आहे. प्राणी संग्रहालयातून आलेल्या एका व्यक्तीने या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. सायबेरियन वाघाची २५० एमएल लघवी ५० युआन (६०० रुपये) इतक्या किंमतीला विकली जात आहे.

बाटलीवर लघवीच्या प्राशनामुळे संधिवात, दुखापत आणि स्नायूंशी संबंधित वेदनांपासून आराम मिळतो असे लिहिलेले आहे. लघवी आल्याच्या तुकड्याबरोबर प्यायची असेही तेथे लिहिले आहे. कोणाला एलर्जी असेल तर त्यांनी लघवी पिऊ नये असेही म्हटले आहे. संधिवातासह अन्य आजारांवर मात करण्यासाठी चीनी लोक वाघाची लघवीचे सेवन करत आहे.

चीनमधील एका फार्मासिस्टने यावर भाष्य केले आहे. 'या प्रकारामुळे वाघांच्या संवर्धनाला हानी पोहचत आहे. त्याशिवाय पारंपारिक चीनी औषधांची बदनामीही होत आहे. वाघाची लघवी उपचार म्हणून वापरली जाऊ शकते याचा कोणताही पुरावा नाही. मात्र या व्यवसायाचा परवाना आपल्याकडे असल्याचा दावा प्राणी संग्रहालयाने केला आहे', असे त्याने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT