Old Man Property News Saam tv
देश विदेश

Old Man Property News: ८८ वर्षीय आजोबांनी फळ विक्रेत्याच्या नावे केली कोटींची संपत्ती; ३ वर्षांनी सत्याचा उलगडा

88 Years Old Man Property: मृत्यूपूर्वी आजोबांनी आपली संपत्ती फळ विक्रेत्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात फळ विक्रेत्याला घर देण्याचे लिहिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

China News:

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती धन आणि संपत्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. अशात चीनमधील शांघाय येथून डोकं चक्रावणारी एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका वृद्ध आजोबांनी त्यांची संपूर्ण संपत्ती एका फळ विक्रेत्याच्या नावे केली आहे. ८८ वर्षीय आजोबांनी घेतलेल्या या निर्णयाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वृद्ध आजोबांनी आपला ३.८४ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट एका फळ विक्रेत्याच्या नावे केला आहे. सदर व्यक्तीने ३ वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला आहे. मृत्यूपूर्वी आजोबांनी आपली संपत्ती फळ विक्रेत्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात फळ विक्रेत्याला घर देण्याचे लिहिले होते.

साल २०२० मध्ये वृद्ध आजोबांचे निधन झाले. त्यावेळी आजोबांच्या नातेवाईकांनी त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगितला. ही संपत्ती फळ विक्रेत्याची होती. त्यामुळे फळ विक्रेत्याने थेट कोर्टात धाव घेतली. सदर घटनेबाबत गेल्या तीन वर्षांपासून खटला सुरू होता. यावेळी नातेवाईकांनी घरावर आपला हक्क सांगत फळ विक्रेत्याने फसवून आजोबांची संपत्ती घेतल्याचं म्हटलं.

आजोबांची मानस्थीती ठिक नव्हती त्यामुळे फळविक्रेत्याने मृत्यूपत्र बनवून आजोबांची त्यावर सही घेतली असा दावा कुटुंबियांनी केला होता. मात्र नोटरी अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. फळ विक्रेता आणि त्याची पत्नी या दोघांनी आजोबांची फार काळजी घेतली होती. वृद्धपकाळात त्यांच्याजवळ कोणीच नव्हते तेव्हा फळ विक्रेत्यांने त्यांचा संभाळ केला. त्यामुळे आजोबांनी आपलं घर फळ विक्रेत्याच्या नावे केले. न्यायालयाने या प्रकरणी फळ विक्रेत्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चर्चेत आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT