india china tension saam tv
देश विदेश

Beijing’s Betrayal: भिकारी पाक श्रीलंकेच्या वाटेवर? चीनच पाकिस्तानला संपवणार चीनसोबत यारी, पाकला पडणार भारी?

China Tightens the Noose: मित्र म्हणून पाकच्या गळ्यात हात टाकणारा चीन आता पाकिस्तानचा गळा दाबण्याच्या तयारीत आहे...चीनी ड्रॅगन कुरापतखोर पाकिस्तानला कसा संपवणार आहे? आणि अमेरिकेच्या पाकिस्तानला मदत करण्याच्या धोरणाचा कसा काटा काढणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश भारताच्या पाठीशी उभं असताना चीनने दहशतवाद्यांचा पाठीराखा पाकिस्तानला पाठींबा दिला. एवढंच नव्हे तर पाकिस्तानला ड्रोन, मिसाईल, फायटर जेट आणि 3.7 अब्ज डॉलरचं कर्ज दिलंय... त्यामुळे मदतीचं जाळं टाकून पाकिस्तानवर मेहेरबान झालेल्या चीनची छोट्या देशांना गिळण्याची रणनीती नेमकी कशी आहे? पाहूयात.

बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून छोट्या देशांना कर्जपुरवठा

लाओस, पाक, मंगोलिया, म्यानमार, कजाकिस्तान, किर्गीस्तान आणि ताजिकिस्तानला कर्ज

कर्ज न फेडल्यास त्या देशातील प्रकल्पांवर चीनकडून मालकी हक्काचा दावा

कर्ज न फेडू शकलेल्या श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर चीनचा कब्जा

आता चायना पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसाठी चीनने पाकिस्तानला 29 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं...मात्र आधीच जागतिक बँकेचं 23.55 अब्ज डॉलर, एशियन बँकेचं 19 अब्ज डॉलर कर्ज आणि आता आयएमएफचं 2.4 अब्ज डॉलर कर्जामुळे पाकिस्तान आधीच गाळात अडकलाय.. तर दुसरीकडे महागाई, बेरोजगारीनं पाकिस्तान हैराण आहे...त्यात आता कर्जबाजारीपणामुळे हैराण असलेल्या पाकिस्तानला कधीच फेडू शकणार नाही, इतकं कर्ज चीननं दिलंय.. त्यामुळे मित्र म्हणून गळ्यात हात टाकणारा चीन पाकिस्तानचा गळा दाबण्याच्या तयारीत आहे.. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच चीनसुद्धा पाकिस्तानवर कब्जा मारण्याची शक्यता अधिक आहे.... त्यामुळे चीन्यांच्या नादी लागून भारताला आव्हान देणाऱ्या पाकड्यांनी आता तरी अक्कल विकत घ्यायला हवी....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT