China: एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण Saam Tv
देश विदेश

China: एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण

चीनमधील वुहान या शहरात कोरोना विषाणूचा उद्भाव झाल्यावर, पुढील काही काळातचं चीनने वुहान शहारात कोरोना विषाणूवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वुहान : चीनमधील China वुहान Wuhan या शहरात कोरोना Corona विषाणूचा उद्भाव झाल्यावर, पुढील काही काळातचं चीनने वुहान शहारात कोरोना विषाणूवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. पण १ वर्षानंतर आता वुहान मध्ये पुन्हा एकदा नव्याने १ कोरोना Corona बाधित रुग्ण सापडला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने administration सतर्कतेची भूमिका हाती घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर आता शहरामधील सर्व लोकांची कोरोना चाचणी Test करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. वर्षभराअगोदर वुहान शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत १ स्थानावर होते. यानंतर पुन्हा याठिकाणी कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. वुहान येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी ली ताओ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे'

हे देखील पहा-

लवकरच शहरामधील सर्व लोकांची न्यूक्लियक अॅसिड Nucleic acid ​चाचणी घेण्याचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. चीन येथील वुहान शहराची लोकसंख्या १ कोटीहून अधिक ११ दशलक्ष आहे. यामुळे एवढ्या व्यापक प्रमाणात ही चाचणी केली जाणार आहे. याअगोदर सोमवारी, वुहान येथील अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की, शहरामधील स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोना संसर्गाची ७ स्थानिक रुग्ण आढळले आहेत.

२०२० च्या सुरुवातीला महिन्यांमधेच चीनने वुहान मध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर आता नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या जवळपास १ वर्षाच्या कालावधी मध्ये वुहानमध्ये कोरोना संसर्गाचे एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाही. वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यावर चीनने आपल्या सर्व नागरिकांना त्यांच्या घरात कैद केले होते.

यासह, घरगुती वाहतूक सुविधा बंद करण्यात आली होती. तसेच कोविड चाचणीसाठी महत्वाची आणि मोठी मोहीम सुरू करण्यात आली. अगोदरच्या काळात वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने चांगलेच थैमान घातले होते. वुहान हे जगामधील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी एक शहर होते. चीनमध्ये मंगळवारी एकूण ६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.

चीनच्या नानजिंग विमानतळावर सफाई कामगारांना डेल्टा विषाणूचे संक्रमण झाल्यावर, विषाणूचा संसर्ग चीन येथील अनेक शहरांमध्ये पसरला आहे. डेल्टा विषाणूच्या संक्रमणाचा वेग खूपच जास्त असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या विविध भागामधून कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT