CM THALAPATHY VIJAY APPOINTS PERSONAL ASTROLOGER TO CHIEF MINISTER’S OFFICE saam tv
देश विदेश

CM थलपती विजयचा आश्चर्यचकित करणारा निर्णय; ज्योतिषाची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

Astrologer Appointment Political OSD In CM Office: मुख्यमंत्री थलपती विजय यांनी वैयक्तिक ज्योतिषाची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ज्योतिषाने निवडणूक विजयाचे भाकीत केला होतं असा दावा केला जातोय.

Bharat Jadhav

  • थलपती विजय यांनी ज्योतिषाची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती केली

  • तामिळनाडू सरकारचा चर्चेतील निर्णय

  • ओएसडी पदावर ज्योतिषी नियुक्त झाल्याने खळबळ

तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्री पद स्विकारताच थलपती विजय यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यातील एका निर्णयाने अनेकांना आश्चर्यचकित करून टाकलंय. मुख्यमंत्री विजय यांनी त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी, रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती केली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी (राजकीय) म्हणून ज्योतिषाची नियुक्ती केल्याने अनेकजण चक्रावले आहेत.

राधन पंडित यांनी निवडणुकीत टीव्हीके यांच्या विजयाचे भाकीत केले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार विजय यांच्या शपथविधीची वेळही बदलण्यात आली होती. सरकारी आदेशानुसार, त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती नंतर स्वतंत्रपणे जारी केल्या जातील. "थिरू रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी (राजकीय) म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून नियुक्ती करण्यात येत आहे," असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

टीव्हीकेच्या विजयाचे भाकीत

दरम्यान राधन पंडित वेट्रिवेल हे तेच ज्योतिषी आहेत, ज्यांनी यापूर्वी विजय आणि त्यांचा पक्ष, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) यांच्या विजयाचे भाकीत केले होते. निवडणुकीतील विजयानंतर त्यांना आता तामिळनाडू सरकारमध्ये एक महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. राज्य राजकारणातील अनेक प्रमुख नेत्यांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध आणि महत्त्वाच्या निर्णयांवरील त्यांचा प्रभाव यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे.

शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली

विजय यांनी सुरुवातीला १० मे रोजी दुपारी ३:४५ वाजता शपथविधी सोहळा आयोजित केला होता, परंतु नंतर राधन पंडित यांच्या सल्ल्यानुसार वेळ सकाळी १० वाजता करण्यात आली. दरम्यान वेट्रिवेल यांनी विजय यांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सातत्याने सल्ला दिला आहे. आता विजय मुख्यमंत्री झाल्यामुळे वेट्रिवेल यांचे राजकीय आणि प्रशासकीय स्थानही वाढले आहे.

अनेक प्रमुख व्यक्तींचं भविष्य सांगितलं

राधन पंडित हे तामिळनाडूतील एक प्रमुख आध्यात्मिक गुरू आणि ज्योतिषी मानले जातात. त्यांनी निवडणुकीच्या खूप आधीच विजयच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. केवळ थलपती विजयच नाही, तर तामिळनाडूतील अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनीही राधन पंडितांचा सल्ला घेतला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांनीही मोठे निर्णय घेण्यापूर्वी राधन पंडितांचा सल्ला घेत असायच्या असं म्हटलं जातं. राधन पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ज्योतिषीय सल्लाही देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT