CM Hemant Soren Saam Digital
देश विदेश

CM Hemant Soren: ED ची नजर चुकवून मुख्यमंत्री हेमंत सोरेन पोहोचले रांचीत, कल्पना सोरेन होणार झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री?

CM Hemant Soren News: ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या रडारला टाळतानाच गायब झाल्याची माहिती होती. मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीत सोरेन रांचीला पोहोचले असून आमदारांची बैठक घेत आहेत.

Sandeep Gawade

CM Hemant Soren

ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या रडारला टाळतानाच गायब झाल्याची माहिती होती. सोमवारी ईडीचं पथक दिल्लीत दिवसभर त्याचा शोध घेत होतं, मात्र सोरेन यांचा शोध लागला नव्हता. मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीत सोरेन रांचीला पोहोचले असून आमदारांची बैठक घेत आहेत. विशेष म्हणजे या भेटीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित आहेत. कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमवारी ईडीचं पथक दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. मात्र ते गायब होते. यानंतर ईडीने त्याच्या घरातून 2 बीएमडब्ल्यू कार आणि काही रोकड जप्त केली. ईडीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानीच ठाण मांडली होती, तरीही सोरेन यांचा काहीही पत्ता लागला नाही. त्यांचे चार्टर्ड विमानही दिल्ली विमानतळावरच उभे होते. दुसरीकडे भाजपने सोरेन यांना बेपत्ता मुख्यमंत्री म्हटलं असून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

31 जानेवारीला सोरेन आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असे त्यांच्या कार्यालयाने ईमेलद्वारे ईडीला कळवले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीला सातत्याने उत्तर दिले आहे. 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राहत्या घरी जबाब नोंदवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळे ईडीने विमानतळावर अलर्ट जारी केला होता.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT