Chhattisgarh Latest news  Saam tv
देश विदेश

Chhattisgarh Naxal kills : घनदाट जंगलात २ दिवसांपासून धुमश्चक्री, सुरक्षा दलाच्या जवानांनी ८ नक्षलवाद्यांना शोधून टिपलं

chhattisgarh Naxal Encounter Update : छत्तीसगडधील घनदाट जंगलात २ दिवसांपासून धुमश्चक्री सुरु आहे. या धुमश्चक्रीत सुरक्षा दलाने ८ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं आहे.

Vishal Gangurde

नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडधील घनदाट अबूझमाड जंगलात गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत पोलिसांनी ८ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं आहे.

जंगलात गेल्या २ दिवसांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी छत्तीसगडच्या अबूझमाड जंगलात सुरक्षा दलाने ऑपरेशन सुरु केलं होतं. डीआरजी, एसटीएफ आणि आयटीबीपीच्या ५३ व्या बटालयीनच्या सैन्यांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली.

या मोहिमेत सुरक्षा दलाच्या जवानांनी ८ नक्षलवाद्यांच्या खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. एनआय वृत्त संस्थेकडून या चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगण्यात येत आहे. तर इतर वृत्त माध्यमांनी या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली आहे.

घनदाट जंगलाच चकमक सुरुच

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. अबूझमाडच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यांनंतरही सुरक्षा दलाची कारवाई सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांसह संयुक्त कारवाई सुरू केली.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये नारायण-दंतेवाडा सीमेवर काही दिवसांपूर्वी देखील सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत ७ नक्षवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यावरील सीमवरील मुंगेडी आणनि गोबेल क्षेत्रातील गावात काही नक्षली लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: शिव उपासना फलदायी ठरेल, 5 राशींचं नशीब चमकणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Pune : आय लव्ह यू रिया...पहाटे पहाटे बायकोला मेसेज, टायगर पॉइंटवरून दरीत उडी; IT इंजिनीअरच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update : अजितदादांच्या विमान दुर्घटनेवरून टीका निरर्थक; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा टोला

टी२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या संघातील सदस्याला हृदयविकाराचा झटका; खेळाडूंचं टेन्शन वाढलं

Burning Car Video : भररस्त्यात बर्निंग कारचा थरार, बघता बघता डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT