Smoke rises from the crash site in Jashpur, Chhattisgarh, after a private aircraft collided with a hill in a forested area. 
देश विदेश

Breaking : भयंकर दुर्घटना! खासगी विमान कोसळलं, थेट डोंगराला जाऊन धडकले

Chhattisgarh plane crash today : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात खासगी विमान डोंगराला धडकल्याने भीषण अपघात झाला. जंगल भागात आग लागून धुराचे लोट उठले असून बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Chhattisgarh plane crash Update : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका खासगी विमानाचा अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विमान जाऊन थेट डोंगराला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. येथील आरा टेकड्यांमध्ये हे खासगी विमान (Chhattisgarh Jashpur private plane crash Ara hills details) कोसळले. या विमानात (Private aircraft crash India) किती जण होते? कोणकोण होते? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पण विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला अन् धुराचे लोट हवेत उडाल्याचे दिसले. विमान दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्तीसगडमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगलात चार्टर्ड विमान झाडांना धडकले. अपघातानंतर डोंगराळ भागातून आगीच्या ज्वाला आणि धूर निघताना दिसत होता. दरम्यान, विमान दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तात्काळ सर्वांनी बचावकार्य सुरू केले. विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT