Security forces during an anti-Naxal operation in Sukma-Bijapur region of Chhattisgarh. saam tv
देश विदेश

Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत १४ जणांचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यासह २० जणांचं आत्मसमर्पण

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूर येथे झालेल्या दोन मोठ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी १४ नक्षलवाद्यांना ठार केले. दरम्यान मोस्ट वॉन्टेड माओवादी देवा बरसेनं २० जणांसह हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केले.

Bharat Jadhav

  • सुकमा आणि विजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई

  • दोन वेगवेगळ्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

  • घटनास्थळी मृतदेह आणि शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. सुकमाच्या किस्ताराम भागात आणि विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलण्यात आलं. सुकमामधील १२ तर विजापूरमध्ये २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. सुरक्षा दलानं सर्वांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त केली आहेत.

दरम्यान परिसरात शोध मोहीम सुरू आहे . दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. याच दरम्यान छत्तीसगडचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी, विशेष क्षेत्रीय समिती सदस्य (एसझेडसीएम) देवा बरसेनं हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केले आहे. देवासोबत इतर २० नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले आहे.

नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यावरून सुकमाच्या किस्ताराम भागात डीआरजी टीम रवाना करण्यात आली. या कारवाईदरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजता चकमक सुरू झाली. यात सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. शोध सुरू आहे. सुकमाप्रमाणे विजापूरमध्येही नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर विजापूरमध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली.

शनिवारी सकाळी डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पहाटे ५ वाजल्यापासून अधूनमधून चकमक सुरूय. शोध मोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणाहून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेत. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी चकमकीची पुष्टी केलीय. ठार झालेल्यांमध्ये एकावर ५ लाख रुपयांचा इनाम होते. तो क्षेत्र समिती सदस्य होता, तर दुसऱ्यावर ८ लाख रुपयांचे इनाम होते.

याआधी २५ डिसेंबर रोजी सुरक्षा दलांनी छत्तीसगडच्या शेजारील राज्यातील ओडिशामध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा केला. येथील कंधमाल येथे झालेल्या चकमकीत सहा जण ठार झाले होते. यामध्ये केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) गणेश उईके (६९) यांचा समावेश आहे. ज्यांच्यावर १ कोटी रुपयांचे इनाम होते. दोन महिला नक्षलवादी देखील मारल्या गेल्या. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT