Chhatrapati Shivaji Maharaj Saam Tv
देश विदेश

Chhatrapati Shivaji Maharaj : कॅलिफोर्नियातील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला; पुण्याशी खास कनेक्शन

उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

वृत्तसंस्था

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Stolen : कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन जोस येथील उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. सॅन जोस पार्कच्या विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे. 

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा गायब आहे. मात्र, तो कधी चोरीला गेला हे स्पष्ट झालेले नाही. पुतळा चोरीला गेल्यानंतर त्याला शोधण्यासाठी आम्ही समुदायाच्या नेत्यांसोबत काम करत असून याबद्दल आम्ही सतत अपडेट देत राहू, असे विभागाने ट्विटमध्ये (Tweet) म्हटले आहे. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यांनी लोकांकडून मदत मागितली आहे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्याशी खास कनेक्शन

कॅलिफोर्नियातील सॅन जोस हे शहर पुण्याचे (pune) 'सिस्टर शहर' म्हणून ओळखले जाते. या उपक्रमाअंतर्गत सॅम जोस शहराला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर शहर अतिशय दु:खी असल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जनतेची मदत घेण्यात येत असल्याचे विभागाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आज अश्रू अनावर....

Curd With Salt Or Sugar : दह्यात साखर मिसळून खावं की मीठ? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर काय

Coastal Road : मुंबई कोस्टल रोडला १ वर्ष पूर्ण! २४ तास सेवेमुळे वाहनांचा वेग वाढला; आकडा वाचून चक्रावून जाल

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT