Petrol-diesel Saam Tv News
देश विदेश

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त; एका SMS वर चेक करा नवीनतम दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान,  शनिवारी सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत.  (Latest Marathi News)

महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोलच्या दरात सुमारे 0.89 पैशांची घसरण झाली आहे. मात्र, तरीही येथे पेट्रोलचा दर 105.96 रुपये प्रतिलिटर आहे. येथे पेट्रोल 97.52 रुपये आणि डिझेल 90.36 रुपये प्रति लीटर आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 0.27 पैशांनी वाढले असून ते 96.49 रुपये आणि आणि डिझेल 92.23 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे हरियाणामध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात 28 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पंजाबमध्येही पेट्रोल 0.29 पैशांनी स्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 0.25 पैशांची घसरण झाली आहे. आज चेन्नईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात किंचित वाढ झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.73 रुपये. डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT