Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरातील इंधनाचा दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आज अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत बदल होताना दिसत आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

16 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेल 59 पैशांनी महागले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या (Petrol) दरात 32 पैशांनी तर डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात इंधनाच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात 44 पैसे आणि डिझेलच्या (Diesel) दरात 41 पैशांनी वाढ झाली आहे. तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये इंधनाच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. (Petrol Price)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT