Champions Trophy  Saam tv
देश विदेश

Champions Trophy : टीम इंडिया ठरली चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स; PM नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून कौतुकाचा वर्षाव, कोण काय म्हणालं?

Champions Trophy update : टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ठरली. टीम इंडियाच्या विजयानंतर PM नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून कौतुकाचा वर्षाव झाला.

Vishal Gangurde

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकत किताबावर नाव कोरलं आहे. टीम इंडिया जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासहित अनेक राजकीय नेत्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने टीम इंडियाच्या अभिनंदनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'एक असाधारण खेळ आणि एक असाधारण निकाल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणणाऱ्या आमच्या क्रिकेट टीमचा अभिमान वाटतो. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या कामगिरी करणाऱ्या आमच्या टीमचं अभिनंदन'.

अमित शहांकडून टीम इंडियाचं अभिनंदन!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाले, 'इतिहास रचणारा विजय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणाऱ्या टीम इंडियाचं अभिनंदन. मैदानात ट्रॉफी जिंकून देशाला गौरव वाटणारी कृती केली आहे. टीम इंडियाला पुढील खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टीम इंडियाने चांगली कामगिरी अशीच करत राहावी'.

राहुल गांधींकडून कौतुकाचा वर्षाव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी चॅपियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. 'खूप चांगला विजय पोरांनो, तुम्ही सर्वांनी अब्जो लोकांचं हृदय जिंकलं आहे. टीम इंडियाची स्पर्धेतील कामगिरी प्रेरणादायी राहिली. चॅम्पियन्सचं अभिनंदन'.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'अनस्टॉपेबल चॅम्पियन्स. टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ घरी आणणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT