Central Govt Issues Guidelines for Private Coaching Classes Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंद; जाणून घ्या केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन्स

Private Coaching Classes: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईन्सनुसार, यापुढे कोचिंग क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत.

साम टिव्ही ब्युरो

Central Govt Issues Guidelines for Private Coaching Classes:

खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईन्सनुसार, यापुढे कोचिंग क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. तसेच चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासनेही देऊ शकणार नाहीत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग संस्थांमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही गाईडलाईन्स तयार केली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाईडलाईन्समध्ये काय सांगण्यात आलं आहे?

गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कोणतीही कोचिंग क्लासेसला पदवी नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही. कोचिंग क्लासेस पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा चांगली रँक मिळवून देण्याची किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत. (Latest Marathi News)

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग क्लासेसमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही गाईडलाईन्स तयार केली आहेत.

"कोचिंग इन्स्टिट्यूटची एक वेबसाइट तयार करावी. ज्यामध्ये शिक्षकांची पात्रता (शिक्षण), अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क याची तपशीलवार माहिती असावी," असे गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दबाव कमी कसा करता येईल, यासाठी क्लासेसने पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणता वर्ग चालवावेत, असंही गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT