Petrol Diesel Price News Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price News: पेट्रोल-डिझेलचे कमी होणार दर? मोदी सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा...

Central Government News: पेट्रोल-डिझेलचे कमी होणार दर? मोदी सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा...

Satish Kengar

Petrol Diesel Price News: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईचा मोठा फटका हा सामान्यांना पडत आहे. अशातच जुलै महिन्यात देशातील महागाईचा दर 15 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान केंद्र सरकार समोर आहे.

महागाई कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या नियोजनात व्यस्त आहे. गेल्या वेळी देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यात आले होते. 21 मे रोजी अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. (Latest Marathi News)

यावेळीही सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करात मोठी कपात करण्याची शक्यता आहेत. केंद्र सरकारने कपात केल्यानंतर राज्यांवर कर कमी करण्याचा दबाव वाढणार आहे. त्यामुळे राज्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.

याचाच परिणाम म्हणून देशात महागाई कमी होऊ शकते. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात तीन कार एकमेकांवर धडकल्या

रात्रीच्या वेळी लाल किल्ल्याच्या मागे मुघल राण्या काय करत असत?

ना सिग्नल, ना ट्रॅफिक; मुंबईतून थेट २५ मिनिटांत गाठा ठाणे, प्रकल्प कधी पूर्ण होणार? वाचा सविस्तर

ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासलंय त्यांच्यावर काही बोलायचं नाही उदय सामंत यांचा रोख कोणाकडे? VIDEO

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT