Will Maharashtra Get The Education Ministry? Political Speculation Grows After Pradhan's Resignation saam tv
देश विदेश

शिक्षणमंत्रिपद महाराष्ट्र्राला मिळणार? प्रधान यांच्या राजीमान्यानंतर राजकीय घडामोडींना वेग

Who Will Be Education Minister: विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. आता देशाचा शिक्षणमंत्री कोण होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राला हे महत्त्वाचे खाते मिळू शकेल का, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • विद्यार्थ्यांच्या दीर्घ आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

  • NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला होता.

  • राजीनाम्यानंतर नवीन शिक्षणमंत्री कोण होणार याबाबत राजकीय चर्चांना वेग

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दबावापुढे मोदी सरकार नमलं आहे. विद्यार्थ्यांच्या ३६ दिवसांच्या लढ्याला आज यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून देशभरातील विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. (Maharashtra get education ministry after Dharmendra Pradhan resignation)

विद्यार्थ्यांच्या ३७ दिवसांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात प्रधान यांनी नमूद केले की, जंतरमंतर येथील परिस्थिती देशाची एकता आणि अखंडता यांच्यासाठी धोका निर्माण करणारी आहे. तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, या उद्देशाने आपण हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी आल्या राजीनाम्या पत्रात म्हटलंय. आंदोलनाच्या दबावाखाली राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे मोदी सरकारमधील पहिले मंत्री ठरलेत.

महाराष्ट्राला मिळणार शिक्षणमंत्रिपद?

शिक्षणमंत्री प्रधान यांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती. प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यात त्यांनी तरुणांना देशाची खरी ताकद असल्याचे नमूद केले आणि गेल्या दहा दिवसांतील घटनांबद्दल दुःख व्यक्त केले. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील शिक्षणमंत्री कोण होणार, याकडे लक्ष लागलंय. दरम्यान देशाचा पुढील शिक्षणमंत्री हा महाराष्ट्रातील होणार असल्याचा शक्यता वर्तवली जातेय.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले. राज्यातील दोन्ही नेते आता दिल्लीत असून त्यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठकीत उपस्थित होते.

राजकीय सूत्रांनुसार, पुढील देशाचा शिक्षणमंत्री महाराष्ट्रातील असून शकतो. हे मंत्रीपद भाजप किंवा शिंदे गट शिवसेनेला भेटू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळेच देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही मोठी घडामोड घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षण मंत्री होणार - संजय राऊत

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. एकीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच, संजय राऊतांनी खळबळ उडवून देणारा दावा केला.

देवेंद्र फडणवीस हे नवे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असा दावा राऊत यांनी केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत. अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. केंद्रात जाण्याबाबत अनेक चर्चा होत्या. आता योगायोग आल्याचं राऊत म्हणालेत

केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा चालू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला केंद्रात तीन मंत्रि‍पदे मिळणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यी पदोन्नती होणार असल्याचेही सांगितले जातंय. नितीन गडकरी यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी नरेंद्र मोदी टाकू शकतात. तर काही खात्याची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते अंत्यविधीत, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: झेन जी च्या जल्लोषात, झेन अल्फा मुलंही सहभागी

Migraine Or Headache: तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे की साधी डोकेदुखी? जाणून घ्या दोघांमधील ७ मोठे फरक

Smartphone holes: स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला का असतात छोटी छिद्रं?

Shivneri Fort : पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT