Madhya Pradesh Truck And Car Accident : कार आणि टँकर यांची मध्यरात्री समोरासमोर भयंकर धडक झाली, या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील झाबुया येथे कार आणि टँकरचा हा भयंकर अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सदस्य हे एका लग्नावरून घरी परत येत होते, त्यावेळी काळाने घाला घातला.
झाबुयामध्ये सजेली फाट्याजवळ कार आणि टँकरची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या काचा सगळ्या रस्त्यावर पडल्या होत्या. कारचा चक्काचूर झाला होता. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये दोन पुरूष, तीन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर स्थनिकांची गर्दी झाली. पोलिसांनीही घटनास्थळावर धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झाबुया जिल्हामध्ये नोगावा जवळ सजेला फाटकवजळ टँकर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला होता. अपघातमध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. सध्या मुलीचीं प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भयंकर अपघात मध्यरात्री दोन वाजता झाला. मानपुर येथील लग्न आटोपून घराकडे परत येत होते, त्यावेळी काळाने घाला घातला. कारमधील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच थांदला आणि मेघनगर पोलीस ठाण्याची पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जखमी आणि मृतांना थांदला आणि मेघनगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मुकेश (वय ४०), सावली (३५ वर्षे), विनोद (१६ वर्षे), पायल (१२ वर्षे), मढी (३८ वर्षे), विजय भारू बामणिया (१४ वर्षे), कांता (१४ वर्षे), रागिणी (९ वर्षे), अकली (३५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर पायल सोमला परमार (१९ वर्षे) आणि आशु (५ वर्षे) जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत सावलीचा मृतदेह मेघनगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला, तर इतर मृतांचे मृतदेह थांदला सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.