CBSE Result 2025 Saam Tv
देश विदेश

CBSE Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर, cbseresults.nic.in वर पाहा रिझल्ट

CBSE Board Class 12th Result DECLARED: आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई १२वीच्या निकाल ८८.३९ टक्के लागला आहे.

Siddhi Hande

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकालदेखील जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डात बारावीचे तब्बल ४२ लाख विद्यार्थी बसले होते. सीबीएसई बोर्डाचा निकाल ८८.३९ टक्के लागला आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल तुम्ही (cbseresults.nic.in , cbse.gov.in) या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

CBSE बोर्डाचा निकाल कसा पाहावा? (How To Check CBSE 12TH Result 2025 )

वरील वेबसाइटपैकी एक उघडा. (cbseresults.nic.in , cbse.gov.in)

"Senior School Certificate Examination (Class XII) Results 2025" लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक (School Number), अ‍ॅडमिट कार्ड आयडी इ. माहिती भरून "Submit" क्लिक करा.

निकाल स्क्रीनवर दिसेल — तुम्ही त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता.

विजयवाडा येथील निकाल सर्वाधिक

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात सर्वाधिक निकाल हा विजयवाडा येथे लागला आहे. विजयवाडा येथील ९९.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहे. सीबीईएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेत मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे. ९१ टक्के मुली या परीक्षेत पास झाल्या. आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तृतीयपंथी सर्व विद्यार्थी १२वीच्या परीक्षेत पास झाले आहेत.

कोणी मारली बाजी?

सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेच्या निकालात जवाहर नवोदया विद्यालयाने खूप चांगली कामगिरी केली आहे. या शाळेचा निकाल ९९.२९ टक्के लागला आहे. यानंतर केंद्रिय विद्यालयाचा निकाल ९९.०५ टक्के लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT