Omicron In Delhi: सी.एम. केजरीवालांनी केले नवे निर्बंध जाहीर, म्हणाले, गर्दी दिसल्यास... Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? सीबीआयने दिल्ली CM हाऊसच्या नूतनीकरण प्रकरणी चौकशी केली सुरू

Delhi Cm House Renovation Case: केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? सीबीआयने दिल्ली CM हाऊसच्या नूतनीकरण प्रकरणी चौकशी केली सुरू

Satish Kengar

Delhi Cm House Renovation Case:

सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरण प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावरून बराच वाद झाला होता. त्यानंतर सीबीआयने याबाबत चौकशी सुरू केल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.

दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेस पक्षाने केला होता. नूतनीकरणादरम्यान लाखो रुपये किमतीचे पडदे आणि संगमरवरी लावण्यात आल्याचा दावा या पक्षांकडून केला जात आहे. आता या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ६ फ्लॅग स्टाफ रोड येथील घराच्या नूतनीकरणाबाबत भाजप आणि काँग्रेसनेही आरोप केला होता की, दिल्ली कोरोना महामारीने त्रस्त असताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नूतनीकरणाचे काम केले होते. (Latest News on Politics)

बंगल्यातील काम नव्या पद्धतीने करून घेण्यासाठी आर्थिक नियमांमध्ये बदल केल्याचा आरोपही करण्यात आला. नूतनीकरणादरम्यान काढण्यात आलेल्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : घोलप कुटुंबातला वाद चव्हाट्यावर; माजी मंत्री बबनराव घोलपांनी मुलीलाच काढली नोटीस

Maharashtra News Live Updates : प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Jammu-kashmir Attack: संडे बाजारात ग्रेनेड हल्ला, १० जण जखमी, दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू

Maharashtra Election : महायुतीत यादवी युद्ध, बंडखोरांमुळे वाढली डोकेदुखी; कोणत्या उमेदवारापुढे थोपटले दंड?

Child Health: डासांपासून मुलांची काळजी कशी घ्यावी?

SCROLL FOR NEXT